अनंत
फौंडेशन

News

अनंत फौंडेशनकडून मणगुत्ती ग्रामदेवी महालक्ष्मी मंदिर जिर्णोद्धारासाठी ₹25 लाखांचे योगदान

WhatsApp Image 2025-04-16 at 12.46.50 PM

मणगुत्ती, ता. हुक्केरी, जि. बेळगाव – ग्रामदेवता महालक्ष्मी देवीच्या मंदिराचा जिर्णोद्धार हे मणगुत्ती गावासाठी एक महत्त्वाचे आणि धार्मिकदृष्ट्या पवित्र कार्य ठरत आहे. या पवित्र कार्यासाठी अनंत फौंडेशन कडून अंदाजे ₹25,00,000/- (पंचवीस लाख रुपये) इतकी  रक्कम देण्यात येत आहे.

मंदिर हे गावाच्या आस्था, श्रद्धा आणि सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक आहे. अनेक वर्षांपासून या मंदिराची स्थिती जीर्णावस्थेत असल्यामुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर, जिर्णोद्धाराच्या कार्याला गती देण्यासाठी अनंत फौंडेशनने पुढाकार घेतला आहे.

ही निधी मंदिराच्या  दुरुस्ती, नूतनीकरण, सौंदर्यीकरण,  इत्यादींसाठी वापरण्यात येणार आहे. यामुळे केवळ मंदिराचाच कायापालट होणार नाही, तर भक्तांना अधिक चांगला अनुभव मिळणार आहे.

अनंत फौंडेशन सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. गावोगावी अध्यात्मिक वारसाचे जतन करण्याचा त्यांचा हेतू या उपक्रमातून स्पष्टपणे दिसून येतो. या योगदानाबद्दल ग्रामस्थांनी व स्थानिक प्रशासनाने फौंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.