कोल्हापूर – श्री सिद्धगिरी महासंस्थान मठ, कणेरी (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित महाप्रसादासाठी देणगी देण्यात आली.
या धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमात हजारो भाविक सहभागी होतात. त्यांच्या भोजनाची योग्य व्यवस्था व्हावी, या हेतूने ही देणगी यात आली. या उपक्रमामुळे महाशिवरात्रीच्या पवित्र दिवशी आलेल्या भक्तांना आनंदाने व श्रद्धेने प्रसादाचा लाभ घेता आला.
धर्मकार्य आणि सामाजिक सेवा यांचा संगम घडवणाऱ्या अशा उपक्रमांमध्ये सहभाग घेणे ही एक सामाजिक बांधिलकी मानून अनंत फौंडेशन ने आपली भूमिका बजावली.