धार्मिक कार्यास भक्कम आधार – मनगुत्तीत देणगीदारांचा गौरव
यमकानमर्डी, ०७: कोल्हापूर येथील अनंत फौंडेशनच्या अध्यक्ष ओंकार जावीर आणि विश्वस्त सचिन कांबळे, सुनिल पाटील, सिद्धार्थ कोसंबी आणि प्रशांत जाधव यांनी मनगुत्ती गावातील धार्मिक उपक्रमात सहभाग घेतला.
त्यांनी श्री मल्लिकार्जुन मंदिराच्या नव्याने बांधलेल्या शिखराच्या कलशारोहण सोहळ्यास उपस्थित राहून, मंदिरासाठी रु. २.५० लाखांची देणगी दिली. तसेच, गावातील श्री लक्ष्मी देवी मंदिराच्या नूतनीकरणासाठी तब्बल रु. २९ लाखांचे योगदान दिले.
या पवित्र कार्यात सहभाग घेतल्याबद्दल आणि उदार देणगीबद्दल गावातील नेत्यांनी, दोन्ही मंदिर समित्यांनी आणि अध्यक्षांनी त्यांचा सन्मानपूर्वक सत्कार केला. या सोहळ्याला गावकरी, भाविक आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
देणगीदारांच्या या योगदानामुळे मंदिर विकासास गती मिळाली असून, गावकरी आणि भक्तांनी त्यांना आभारांची भावना व्यक्त केली.