अनंत फाउंडेशन कोल्हापूर ही सामाजिक संस्था आपला पहिला वर्धापन दिन साजरा करत आहे. गेल्या वर्षभरात आम्ही कृषी विकास, महिला सशक्तीकरण, आरोग्य संवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि शिक्षणाचा दर्जा उंचावणे या पाच महत्वाच्या क्षेत्रांत ठोस कामगिरी केली आहे.
आजच्या बदलत्या काळात ग्रामीण व शहरी भागातील समस्या समजून घेत, शाश्वत विकासाची दिशा ठरविण्याचे कार्य आम्ही निष्ठेने करीत आहोत. शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती पद्धती, महिलांसाठी कौशल्यविकास व स्वावलंबन उपक्रम, आरोग्य शिबिरे, हरित अभियान, तसेच विद्यार्थी घडविणारे शैक्षणिक प्रकल्प हे सर्व आमच्या सामाजिक बांधिलकीचे उदाहरण आहेत.