अनंत
फौंडेशन

News

शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

कोल्हापूर:

मुक्त सैनिक वसाहत येथीआंतरभारती शिक्षण संस्थेच्या शां.कृ. पंत वालावलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन कार्यक्रम शनिवार दिनांक ४/०१/२०२७ रोजी मान्यवरांच्या उपस्थित उत्साही संपन्न झाला. प्रारंभी पूज्य साने गुरुजी व शांतारामबापू वालावलकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांचे हस्ते पुष्पहार घालून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष संजीवभाई परीख होते. प्रमुख पाहुणे अनंत फौंडेशन च्या चेअरमन सौ. पूजा जोशी, वारणा महिला उद्योग समूहाच्या उपाध्यक्ष सौ. स्नेहा निपुण कोरेइंडो काउंट फाउंडेशनचे कन्सल्टंट श्री अमोल पाटील, आंतरभारती शिक्षण संस्थेच्या कार्याध्यक्ष पल्लवीताई कोरगांकर होते. प्रमुख उपस्थित आंतरभारती शिक्षण मंडळ उपाध्यक्ष जिनरत्न रोटे, सचिव एम एस पाटोळे, प्राथमिक सचि संध्या वाणी, सहसचिव भरत आगौडर, मुक्त सैनिक हाऊसिंग सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव , नेहा कानकेकर, जे वी जाधव, वसंत पाठक, गणेश , महेश वारके, उपमुख्याध्यापक आर. पी. भोरे, स्नेहसंमेलन प्रतिनिधी एस पी पाटील, राजेश वरक, शिक्षक प्रतिनिधी प्रशांत भोसले, मिन्नाज मुल्ला आदी मान्यवर उपस्थित होते. पूरक पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे कॅनरा बैंक वरिष्ठ व्यवस्थापक शितल नारनवरे होते. उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक हायस्कूलच्या मुख्याध्यापिका सौ. वृशाली कुलकर्णी यांनी केले, पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक श्री एम पी पाटील यांनी केला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीवभाई , सौ.स्नेहा कोरे आदी मान्यावर आपली मनीगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या घवघवित यशाबद्दल पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून त्यांचे कौतुक केले. विविध स्पर्धत घवघवित यश संपादित केलेल्या मुलामुलींना ट्रॉफी, सर्टिफिकेट व रोख रक्कम देऊन मान्यवरांच्या हसते गौरविण्यात आले. यावेळी मार्च 2024 मध्ये इयत्ता दहावी गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच विविध क्रीडा स्पर्धा व शालेय स्पर्धेमध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. विविध विभागाचे अहवाल वाचन जिमखाना प्रमुख श्री राजेंद्र बनसोडे, इंद्रायणी पाटील व जयवंत साखरे यांनी केले. विद्यार्थ्यांना बनवलेल्या हस्तपुस्तकेचे वाचन सौ विमल धायगुडे यांनी केले. यावेळी क्रीडा दालन, कला दालन, रांगोळी दालन उद्घाटन करण्यात आले. सूत्रसंचालन शितल कपिलेश्वरी व पल्लवी यादव यांनी केले. आभार शिक्षक प्रतिनिधी श्री. प्रशांत भोसले यानी मानले . कार्यक्रमाम सर्व विद्यार्थी ,शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.