अनंत
फौंडेशन

News

शंकराचार्य मठास अनंत फौंडेशनकडून २९ लाखांची देणगी

संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठ जिर्णोद्धार कामांसाठी कोल्हापूर अनंत फौंडेशनचे अध्यक्ष ओंकार जावोर यांनी २९ लाख रुपयांची देणगी जमा केल्याची माहिती मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानृसिंह भारती महास्वामीजीनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. श्री पुढे म्हणाले श्री शंकराचार्य संस्थान मठ जिर्णोद्धाराचे काम युध्दपातळीवर केले जात आहे. जिर्णोध्दार कामाने मठाचा लूक “प्राचीन मठासारखा दिसतो आहे. मठाचा नगारखाना दगडी गोपूरांने जुन्या नगारखान्याच्या आठवणींना उजाळा देत आहे. नगारखाना लगतच्या श्री हनुमान देवस्थानला दगडी खांब शोभून दिसत असून. हिरण्यकेशी नदी घाटा लगत स्वयंपाक शेड उभारण्यात आले आहे. मठाच्या दगडी बांधकामावर चुना आणि रंगकाम करण्यात आले होते. ते खरडून मठाचा लूक पूर्ववत ठेवण्याचे कार्य करण्यात आले आहे. भक्तगणांना आता पूर्वीचा प्राचीन श्री शंकराचार्य मठ पहाण्याचे भाग्य लाभल्याचे श्रींनी सांगितले. 

Login

Register

terms & conditions