कोल्हापूर –अनंत फौंडेशन तर्फे लक्ष्मीपुरी रिलायन्स मॉल जवळील एकटी संस्था (निराधार महिला) येथे महिलांच्या दैनंदिन वापरासाठी अत्यावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत संस्थेस ६ गाद्या आणि १२ बेडशीट देण्यात आले.
या संस्थेमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलांना आरामदायक झोप आणि स्वच्छता यासाठी या वस्तूंची गरज होती. अनंत फौंडेशनने ही गरज ओळखून, गरजू महिलांसाठी हे साहित्य दिलं. यामुळे संस्थेतील महिलांच्या दैनंदिन जीवनात थोडासा आराम आणि सन्मान मिळण्यास मदत होणार आहे.
अनंत फौंडेशन यापुढेही सामाजिक जबाबदारी जपत गरजूंसाठी अशा उपयुक्त उपक्रमांद्वारे मदत करत राहणार आहे.