आदमापूर. समाजसेवा आणि मानवसेवेच्या कार्यात सदैव पुढे असणाऱ्या अनंत फौंडेशन या संस्थेने एक स्तुत्य उपक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. आदमापूर येथील श्री. सद्गुरु संत बाळूमामा देवस्थान येथे आयोजित धार्मिक उत्सवाच्या पार्श्वभूमीवर, ५००० भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमाचा ठराव संस्थेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता आणि त्यानुसार नियोजनबद्ध पद्धतीने संपूर्ण सेवा पार पाडली गेली. महाप्रसादाच्या व्यवस्थापनापासून ते वितरणापर्यंत सर्व जबाबदारी अनंत फौंडेशनच्या स्वयंसेवकांनी मनोभावे पार पाडली.
संस्थेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, बाळूमामा हे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांच्या चरणी सेवा म्हणून आम्ही हा महाप्रसाद अर्पण केला. ही सेवा करताना आमची सामाजिक बांधिलकी जपण्याचा आम्ही प्रयत्न केला.”