समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि बहुजनांसाठी आयुष्य समर्पित करणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती अनंत फौंडेशन, कोल्हापूर च्या कार्यालयात सन्मानपूर्वक साजरी करण्यात आली.
या वेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या जीवनकार्यावर भाष्य करत त्यांचे विचार आजही तितकेच प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
कार्यक्रमादरम्यान कार्यालयीन कर्मचारी, स्वयंसेवक आणि पदाधिकारी यांनी सामूहिकरित्या सहभाग घेतला. हा कार्यक्रम साधेपणाने पण श्रद्धापूर्वक साजरा करण्यात आला.